सासष्टीतील दिकरपाली येथे भंगारअड्ड्याला भीषण आग

मडगाव अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
1 hours ago
सासष्टीतील दिकरपाली येथे भंगारअड्ड्याला भीषण आग

​मडगाव: सासष्टी तालुक्यातील (Salcete Taluka) दिकरपाल येथील दुकळे पोल्युशन सेंटरनजीक असलेल्या भंगार अड्ड्याला मंगळवारी सकाळी आग लागली. मडगाव अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे ही आग पूर्णपणे विझवण्यात आली.

मंगळवारी सकाळी ६.१८ वाजता दिकरपाल येथे दुकळे पीयूसी सेंटर नजीक ही घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच मडगाव अग्निशमन दलाने (Margao fire station) घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यावर कचऱ्याला लागलेली आग वाढत जात असल्याचे लक्षात आल्यावर जवानांनी आगीवर पाण्याचा मारा केला. अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनंतर ही आग यशस्वीरीत्या आटोक्यात आली आहे.


 आग पूर्णपणे विझवण्यात यश आले असून; यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याने प्रदूषण झाले.


हेही वाचा