
पणजी : पेडणे तालुक्यातील (Pernem Taluka) उगवे येथील माऊली मंदिराजवळील सुमारे ४० वर्षे जुनी जलवाहिनी पुन्हा एकदा फुटल्याने (Water pipeline burst near Mauli Temple) मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. परिसरातील नागरिकांना गेल्या तीन दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. स्थानिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार होणाऱ्या गळतीमुळे पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांनी संबंधित विभागाकडे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली असून; जुनी जलवाहिनी बदलून नवीन पाइपलाईन टाकण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.