कृषी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकाची १५ पदे जाहीर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
कृषी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकाची १५ पदे जाहीर

पणजीः गोवा कृषी महाविद्यालयात (Goa College of  Agriculture)  सहाय्यक प्राध्यापकाची १५ पदे जाहीर करण्यात आली आहेत. ही सर्व पदे कंत्राटी आणि व्याख्याता तत्वावर भरण्यात येणार आहेत. त्यातील ८ पदे कंत्राटी तर ७ पदे व्याख्याता तत्वार जाहीर करण्यात आली आहेत. 

महाविद्यालयाने  जाहीरात प्रसिद्ध करून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आयसीएआर मान्यताप्राप्त बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र उमेदवारांकडून कंत्राटी किंवा व्याख्याता तत्वावर सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक (फार्म व्यवस्थापक) इत्यादी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 

अर्जा बरोबर दहावीपासून पुढील सर्व उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रिकांच्या स्वत: प्रमाणीत केलेल्यात प्रती जोडणे आवश्यक आहे. जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत कृषी महाविद्यालयाचे डिन यांच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

एकूण १५ पदवी अॅग्रोनॉमी विषयात २ कंत्राटी आणि एक व्याख्याता तत्वावर,  कृषी अर्थशास्त्र विषयात एक व्याख्याता तत्वावर, मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र आणि वनस्पती पॅथोलॉजी विषयात दरेकी एक पद कंत्राटी पद्धतीवर, कृषी वनस्पतीशास्त्र, जेनेटिक्स आणि प्लांट ब्रिडिंग, पशुविज्ञान आणि दूध व्यवसाय विज्ञान विषयात प्रत्येकी एक पद व्याख्याता तत्वावर, कृषी विस्तार शिक्षण एक पद व्याख्याता तत्वार,  कृषी अभियांत्रिकी, गणित, सांख्य‌िकी (कृषी माहिती तंत्रज्ञान आणि आर्ट‌िफिशल इंन्टेलिजन्स) विषयात प्रत्येकी एक पद व्याख्याता तत्वार, फार्म व्यवस्थापक. कृषी किटकशास्त्र आणि महाविद्यालय समुपदेशक प्रत्येकी एक पद कंत्राटी पद्धतीवर भरण्यात येणार आहेत. 

या पदांच्या आरक्षणासंदर्भात गोवा सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणार. ही पदे कामाच्या उपलब्धतेनुसार आणि गोवा व‌िद्यापीठ, उच्च शिक्षण संचालनालय, गोवा सरकार यांच्या मंजुरीच्या आधीन राहून भरणार. अर्जाचा नमुना, आवश्यक पात्रता, सेवेच्या शर्ती तसेच इतर माहितीसाठी महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. मुलाखतीसाठी ‘कॉल लेटर’ केवळ ईमेलद्वारे पाठवणार. 


हेही वाचा