गोवा दोन आठवड्यांत पर्यटकांनी ‘हाऊसफुल्ल’

देशी पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी : उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गोव्याला पसंती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30 mins ago
गोवा दोन आठवड्यांत पर्यटकांनी ‘हाऊसफुल्ल’


पणजी :
उन्हाळ्याची सुट्टी (summer holidays) साजरी करण्यासाठी पर्यटकांनी गोव्याला (tourist in Goa) पसंती दिली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने देशी पर्यटकांनी संपूर्ण गोवा गजबजला आहे. पर्यटकांच्या या वाढत्या संख्येमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला सोन्याचे दिवस आले आहेत. मात्र इंधनाच्या वाढत्या दरांमुळे भविष्यात पर्यटनावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता ‘टीटीएजी’ने व्यक्त केली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून गोव्याचे समुद्रकिनारे, विशेषतः उत्तर गोवा पर्यटकांनी पूर्णपणे ‘हाउसफुल्ल’ झाले होते. एरवी फक्त शनिवार-रविवारी पर्यटकांची गर्दी असते, पण हे गेल्या दोन आठवड्यांत गोवा पर्यटकांनी गच्च भरलेला होता. गोव्यात येणारी विमाने, ट्रेन्स आणि बसेस फुल्ल होत्या. त्याशिवाय अनेक लोक स्वतःची वाहने घेऊन आल्यामुळे गोव्याच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.
गेल्या दोन आठवड्यांत इंधनाचे दर हळूहळू वाढत होते. परंतु, बहुतांश पर्यटक स्वतःची वाहने घेऊन आले असल्याने या दरवाढीचा सध्यातरी पर्यटनावर परिणाम झालेला नाही.
इंधन दरवाढीमुळे परदेश प्रवास कमी
पर्यटनातील या वाढीमागे पंतप्रधानांनी केलेले आवाहन हे एक कारण असू शकते. आंतरराष्ट्रीय विमान इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे सध्या परदेशात प्रवास करण्याचे पर्याय कमी झाले आहेत, तसेच ते परवडणारेही राहिलेले नाहीत. त्यामुळे गोवा हे देशांतर्गत पर्यटनासाठी पहिल्या पसंतीचे ठिकाण म्हणून नावारूपास आले आहे, अशी माहिती सुखिजा यांनी दिली.

हॉटेल्स ८० ते ९० टक्के फुल्ल
या संदर्भात बोलताना ‘टीटीएजी’चे (ट्राव्हल अँड टूरिझम असोसिएशन ऑफ गोवा) अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी सांगितले की, देशांतर्गत पर्यटनाचे प्रमाण खूप चांगले आहे. गेल्या आठवड्यात तारांकित हॉटेल्स ८0 ते ९0 टक्के, तर इतर सामान्य हॉटेल्स ५0 ते ६0 टक्के भरलेली होती.

इंधनाच्या वाढत्या दरांचा परिणाम नक्कीच होणार आहे. सध्या युद्धाच्या परिस्थितीमुळे इंधनाचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे याचा पर्यटकांच्या संख्येवर निश्चितपणे परिणाम होईल.
- जॅक सुखिजा, ‘टीटीएजी’चे अध्यक्ष

हेही वाचा