आरजीपी अंतर्गत वादावर आमदार विरेश बोरकर आज संध्याकाळी सोडणार मौन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
आरजीपी अंतर्गत वादावर आमदार विरेश बोरकर आज संध्याकाळी सोडणार मौन

पणजी: 'रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी' मधील अंतर्गत वादाचे गुपित आज अखेर उघड होईल. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले आरजीपीचे आमदार विरेश बोरकर आज संध्याकाळी आपले मौन सोडतील. या पार्श्वभूमीवर त्यांनी विधानसभेतील आपल्या चेंबरमध्ये एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

आमदार विरेश बोरकर आज पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडून जनतेसमोर येथील, असे वृत्त गोवन वार्ताने प्रसिद्ध केले होते. बोरकर यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला असून, आज संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करतील.

पक्षाचे नेते मनोज परब यांनी राजीनामा दिल्यानंतर आमदार बोरकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, तसेच ते कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ते पक्षातच राहणार की मनोज परब यांच्याप्रमाणेच दुसरी वाट धरणार, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत आमदार बोरकर या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. आरजीपी पक्षाचे भवितव्य आता बोरकर यांच्या स्पष्टीकरणावरच अवलंबून असल्याने, ते काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण गोवेकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा