केपेतील मळकर्णे परिसरात ४.५ मीटर लांबीचा ‘किंग कोब्रा’ पकडला; नागरिकांमध्ये भीती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
केपेतील मळकर्णे परिसरात ४.५ मीटर लांबीचा  ‘किंग कोब्रा’ पकडला; नागरिकांमध्ये भीती

पणजी : केपे तालुक्यातील मळकर्णे पंचायत क्षेत्रात  (Village Panchayat Molcornem, Quepem ) तब्बल ४.५ मीटर लांबीचा विषारी नाग (किंग कोब्रा)  (King cobra)  आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन किंग कोब्राला पकडले. त्यानंतर त्याला घनदाट जंगलात सोडण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. 

हा किंग कोब्रा मोठ्या आकाराचा असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्पमित्रांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता वन्यजीवांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. 

सर्पमित्राने आणून सोडल्याचा संशय 

दरम्यान, विषारी नाग कुणीतरी सर्पमित्राने पकडून या परिसरात आणून सोडल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.  पकडलेल्या नाग, सर्प यांना नागरी वस्तीपासून दूर सुरक्षित ठिकाणी सोडण्यासंदर्भात वन खात्याने सर्पमित्रांमध्ये जागृती करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 



हेही वाचा