गोव्याच्या सई गावसची एकपात्री सादरीकरणात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय स्तरावर पटकावला प्रथम क्रमांक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
गोव्याच्या सई गावसची एकपात्री सादरीकरणात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पणजी : गोव्याच्या युवा कलाविश्वासाठी अभिमानाची बातमी आहे.  अवघ्या १३ वर्षीय सई मनेश  गावस हिने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘नॅशनल आर्ट टॅलेंट सर्च (NATS) 2026’ या अखिल भारतीय सांस्कृतिक स्पर्धेत सईने हिंदी एकपात्री प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत गोव्याचे नाव उज्ज्वल केले. 

राष्ट्रीय स्तरावरील या भव्य यशानंतर सई मनेश गावसची आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘१६ व्या सांस्कृतीक ऑलिंपियाड परफॉर्मींग आर्ट्स २०२६’ (‘16th Cultural Olympiad of Performing Arts 2026’)  स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती आपली कला सादर करणार आहे. 

 राष्ट्रीय स्पर्धा प्रतिष्ठित अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विविध राज्यांमधून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये सईच्या दमदार अभिनयाने परीक्षक आणि प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. तिच्या प्रभावी संवादफेकीने, भावनिक अभिनयाने आणि रंगमंचावरील आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने सर्वांची मने जिंकल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

सईने गोव्यातील प्रसिद्ध नाट्यसंस्था ‘अभिव्यक्ती पणजी’चे प्रतिनिधित्व केले. नामवंत दिग्दर्शक आणि रंगकर्मी डॉ. साईश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने विशेष प्रशिक्षण घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सईच्या अभिनयकौशल्याला अधिक धार प्राप्त झाली असल्याचे मानले जात आहे.


हेही वाचा