फादर बोल्मेक्स परेरा यांच्यार सर्वोत्तम उपचार करण्याचे प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
फादर बोल्मेक्स परेरा यांच्यार सर्वोत्तम उपचार करण्याचे प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

पणजी : फादर बोल्मेक्स परेरा यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (गोमेकॉ) (GMC) सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री (Vishwajit Rane) यांनी दिली.

फादर बोल्मेक्स परेरा (Fr. Bolmax Pereira)  यांच्या प्रकृतीबाबत आपण स्वतः गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. गुरुप्रसाद नाईक तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली आहे. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी आरोग्य विभाग सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे आरोग्यमंत्री राणे म्हणाले. फादर परेरा यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, असे आरोग्यमंत्री म्हणाले.