
पणजी : फादर बोलमॅक्स परेरा यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकाॅ) उपचार सुरू असताना निधन झाले.
गेल्या काही दिवसांमागे सहलीला जायला निघाले असता वास्को येथील रेल्वे स्थानकावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, गोमेकाॅत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री उशीरा त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. कालच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी फादर बोलमॅक्स परेरा यांच्यावर गोमेकाॅत सर्वोत्तम उपचार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली असून, दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
..