आदिवासी समाजाला २०२७च्या निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण!

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : आंबावली-केपे येथे ‘प्रेरणा दिन’

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th May, 10:09 pm
आदिवासी समाजाला २०२७च्या निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण!

केपे : गोव्यातील ‘एसटी’ (अनुसूचित जमाती) समाजाला आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजप सरकार प्रामाणिकपणे प्रयत्नशील असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. गेल्या अनेक दशकांत काँग्रेसने या समाजासाठी नेमके काय केले, याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

आंबावलीतील विशेष कार्यक्रमात वक्तव्य

आंबावली येथे आदिवासी कल्याण संचालनालय आणि युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला विविध मंत्री, आमदार, माजी मंत्री आणि आदिवासी समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.

🗳️ एसटी राजकीय आरक्षण : सरकारचा दावा
📌 लक्ष्य → २०२७ विधानसभा निवडणूक
📜 विधानसभा ठराव संमत
🏛️ राज्यसभेत प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा
👥 एसटी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्यावर भर
एसटी दर्जापासून कल्याणकारी योजनांपर्यंत

गोवा मुक्तीनंतर अनेक वर्षे एसटी समाजाकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, असा दावा करत मुख्यमंत्री म्हणाले की, २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली या समाजाला एसटी दर्जा मिळाला.

यानंतर २०१२ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर आदिवासी कल्याण खाते, एसटी आयोग, नोकरभरती आणि विविध योजनांच्या माध्यमातून या समाजासाठी काम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

⏳ महत्त्वाच्या टप्प्यांचा आढावा
२००३ → एसटी दर्जा मिळाल्याचा उल्लेख
२०१२ → आदिवासी कल्याण यंत्रणांचा विस्तार
२०२६ → राजकीय आरक्षणासाठी प्रयत्नांचा दावा
२०२७ → विधानसभा निवडणुकीपूर्वी लक्ष्य
विधेयकाला विरोध कोणी केला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात गोव्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले की, यासाठी विधानसभा आणि राज्यसभेत आवश्यक प्रक्रिया पुढे नेण्यात आली आहे. लोकसभेत या विषयाला कोणी विरोध केला, हे जनतेने पाहावे, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे
① एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा दावा
② ५० वर्षांच्या कामगिरीवर काँग्रेसला प्रश्न
③ विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न
④ आदिवासी कल्याण योजनांचा उल्लेख
#GoaPolitics #STReservation #GoaNews #PramodSawant #TribalRights
हेही वाचा