खिशाला कात्री! इंधनापाठोपाठ महागाईचाही ‘गिअर’ बदलला

दोन आठवड्यांत ४ वेळा इंधन दरवाढ : भाज्या, कडधान्यांचे दर गगनाला; बस प्रवास, हॉटेलिंगही महागणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th May, 10:02 pm
खिशाला कात्री! इंधनापाठोपाठ महागाईचाही ‘गिअर’ बदलला

पणजी : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या दोन आठवड्यांत तब्बल चार वेळा वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. इंधन दरवाढीचा परिणाम आता थेट बाजारपेठेवर दिसू लागला असून भाज्या, दूध, चहा, हॉटेलमधील जेवण आणि सार्वजनिक वाहतुकीच्या खर्चात वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

इंधन दरवाढीचा थेट परिणाम

राज्याबाहेरील विधानसभा निवडणुकांनंतर केंद्र सरकारने इंधन दरवाढीला सुरुवात केली. सध्या राज्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०३.९१ रुपये, डिझेलचा दर ९५.८० रुपये आणि स्पीड पेट्रोलचा दर ११३.५२ रुपये झाला आहे. गेल्या चार टप्प्यांतील वाढीनंतर इंधन सुमारे साडेसात रुपयांनी महागले आहे.

⛽ इंधन दरवाढ : चार टप्प्यांचा परिणाम
१५ मे
१९ मे
२३ मे
अंतिम वाढीनंतर
एकत्रित परिणाम : सुमारे ₹७.५० वाढ
शेजारील राज्यांच्या तुलनेत दर कमी; पण दबाव वाढला

सलग दरवाढ होऊनही काही राज्यांच्या तुलनेत गोव्यात इंधन दर कमी आहेत. मुंबईत पेट्रोल १११.२० रुपये आणि डिझेल ९७.८० रुपये प्रतिलिटर आहे, तर बंगळुरूमध्ये पेट्रोल ११०.६० रुपये आणि डिझेल ९८.५० रुपये आहे. मात्र स्थानिक महागाईवर याचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.

📍
गोवा
₹103.91
🏙️
मुंबई
₹111.20
🌆
बंगळुरू
₹110.60
दुधाच्या दरवाढीचा परिणाम

रविवारी ‘गोवा डेअरी’ने दुधाच्या दरात वाढ केली असून एक लिटर पिशवी २ रुपयांनी तर अर्धा लिटर पिशवी १ रुपयाने महाग झाली आहे. यापूर्वी अमूलनेही दरवाढ केली होती. त्यामुळे हॉटेलमधील चहाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरवाढीचे परिणाम
① चहा महागण्याची शक्यता
② भाज्या व कडधान्यांचे दर वाढले
③ बस तिकीट दरवाढीची मागणी
④ हॉटेलमधील राईस प्लेट महागली
🛒 बाजारातील प्रमुख दर
वालपापडी₹१६०
टोमॅटो₹६०
बटाटा₹५०
तूरडाळ₹१२०
शेंगदाणा तेल₹१४६
हॉटेल आणि वाहतूक क्षेत्रावर परिणाम

दूध, भाज्या आणि कडधान्यांच्या वाढलेल्या दरामुळे हॉटेल व्यवसायावरही दबाव वाढला आहे. पूर्वी १०० रुपयांना मिळणारी राईस प्लेट आता ११० ते १२० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्याचवेळी डिझेल दरवाढीमुळे खासगी बस मालकांनी तिकीट दरवाढीची मागणी केली आहे.

बस मालक संघटनेची भूमिका

गेल्या दोन आठवड्यांत डिझेलचा दर साडेसात रुपयांनी वाढल्याने सध्याच्या तिकीट दरात बस चालवणे परवडत नसल्याचा दावा खासगी बस मालकांनी केला आहे.

#FuelPriceHike #GoaNews #Inflation #PetrolPrice #DieselPrice #BusFare #CostOfLiving
हेही वाचा