फार्मसी संपाला गोव्यात १०० टक्के प्रतिसाद

ऑनलाईन, बेकायदा औषध विक्री समाजाला घातक : केमिस्ट ॲंड ड्रगिस्ट संघटना

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
20th May, 06:29 pm
फार्मसी संपाला गोव्यात १०० टक्के प्रतिसाद

पणजी : बेकायदा आणि ऑनलाईन औषध विक्रीच्या (Online medicine sale) विरोधात फार्मसी (Pharmacy in Goa) व्यावसायिकांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला गोव्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. हॉस्पिटलच्या फार्मसी सोडल्यास इतर सर्व फार्मसी बंद होत्या. अपोलो, वेलनेस फॉरेवर, सालसेत, जीवनरेखा आणि इतर प्रसिद्ध फार्मसी बुधवारी बंद होत्या. फार्मसी बंदला राज्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला, अशी माहिती  केमिस्ट ॲंड ड्रगिस्ट संघटनेचे सरचिटणीस प्रसाद तांबा यांनी दिली. 

ऑनलाईन औषध विक्री आरोग्याचा विचार करता घातक आहेत, असे संघटनेचे सरचिटणीस प्रसाद तांबा यांनी म्हटले आहे. गोव्यासहीत देशात जीएसआर ८१७ आणि २२० या नियमाखाली औषधांची ऑनलाईन विक्री होते. जीएसआर ८१७ आणि २२० नियमाला मान्यता मिळालेली नाही. यावर सूचना मागवल्या आहेत.  औषधे घरी पोहोचवायचा नियम कोविड महामारी वेळी होता.

कोविड महामारीनंतर तो बंद करायला हवा. मात्र, तो बंद झालेला नाही. ऑनलाईन औषध विक्रीमुळे फार्मसी व्यवसायाला फटका बसत आहे. याच्या विरोधात देशपातळीवर फार्मसी संघटनेने बुधवारी फार्मसी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गोव्यातील संघटनांनी सुद्धा संपाला पाठिंबा देऊन फार्मसी बंद ठेवल्या. पणजी, म्हापसा, मडगाव, वास्को, फोंडा, डिचोली, साखळी या सर्व शहरातील फार्मसी बंद होत्या. 

हेही वाचा