पिर्ण-बार्देश येथील अष्टगंधा क्रेडिट सोसायटीत ११ कोटींची अफरातफर; एका माजी संचालकाला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
16 mins ago
पिर्ण-बार्देश येथील अष्टगंधा क्रेडिट सोसायटीत ११ कोटींची अफरातफर; एका माजी संचालकाला अटक

म्हापसा : पिर्ण-बार्देश येथील अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत (Ashtagandha Urban Credit Co-operative Society)  ११ कोटींच्या अफरातफर ( Financial fraud and cheating)  प्रकरणात माजी संचालक प्रकाश कांदोळकर (७०, पेडणे) याला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हा विभागाने (EOC) ही मोठी कारवाई केली. 

सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता व निधीचा गैरवापर झाल्याची तक्रार समोर आल्यानंतर सखोल चौकशी सुरू केली होती. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्याने संबंधितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

या प्रकरणात प्रकाश कांदोळकर याची भूमिका संशयास्पद आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. या बहुचर्चित आर्थिक घोटाळ्यामागील इतर संबंधितांचा शोधही सुरू असून, आणखी काही धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा