गोवा केमिस्ट ॲंड ड्रगिस्ट संघटनेचा दावा

पणजी : ई-पोर्टलद्वारे (E-Portal) होत असलेल्या बेकायदा औषध विक्रीच्या (Illegal medicine cell) निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी फार्मसी (Pharmacy, Goa) व औषधालय बंदला गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील हॉस्पिटलातील फार्मसी आणि जनऔषधी केंद्रे वगळता बहुतांश सर्व औषधालये दिवसभर बंद ठेवण्यात आली.
या बंदमुळे अनेक भागात औषध खरेदीसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, फार्मासिस्ट आणि औषध विक्रेत्यांनी हा बंद रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि औषध विक्रीतील नियमबाह्य व्यवहारांविरोधातील लढा असल्याचे स्पष्ट केले.
गोवा केमिस्ट ॲंड ड्रगिस्ट संघटनेचे सरचिटणीस प्रसाद तांबा यांनी सांगितले की, “ऑनलाईन पद्धतीने होणारी औषध विक्री ही आरोग्यदृष्ट्या समाजासाठी घातक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे सहज उपलब्ध होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.” संघटनांनी केंद्र सरकारकडे ई-पोर्टलद्वारे होणाऱ्या बेकायदा औषध विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
(बातमी अपडेट होत आहे.)