
क्वालांपूर : भारतीय सॅपेक टाकरो संघाने (Indian Sepak Takaraw Team) दमदार खेळाचे प्रदर्शन करत पराभव करून जागतिक सॅपेक टाकरो अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. भारतीय संघाने उपात्य फेरीत म्यानमारला (Myanmar) नमवत ही कामगिरी केली. मलेशियातील क्वालांपूर येथे सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली.
भारतीय संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आंतरराष्ट्रीय सॅपेक टाकरो महासंघाचे महासचीव अब्दूल हलीम कादर यांनी भारतीय सॅपेक टाकरो महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांचे अभिनंदन केले. भारतीय संघाच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.
स्पर्धेचा अंतिम सामना आज संध्याकाळी होणार असून; भारताचा सामना यजमान मलेशिया (Malaysia) संघाशी होणार आहे. या लढतीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. भारतीय संघ विजेतेपद पटकावणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.