
पणजी : काणकोण तालुक्यातील (Canacona Taluka) करमलघाटावर ओम्नी कार आणि प्रवासी बस या वाहनामध्ये झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. यामध्ये एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून; त्याला पुढील उपचारासाठी मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मलघाटावर ओम्नी कारची प्रवासी बसला जोरदार धडक बसली. अपघातानंतर जखमींना इस्पीतळात दाखल करण्यात आले. त्यातील गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला अधिक उपचारासाठी मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात (South Goa District Hospital) दाखल करण्यात आले. अपघात नेमका कसा घडला याची माहिती पोलीस (Goa Police) घेत आहेत.
(बातमी अपडेट होत आहे.)