दोनापावला येथे भरधाव बीएमडब्ल्यू कारचा अपघात; अनेक वाहनांना दिली धडक

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
39 mins ago
दोनापावला येथे भरधाव बीएमडब्ल्यू कारचा अपघात; अनेक वाहनांना दिली धडक

पणजी: दोनापावला सर्कल येथे काल रात्री अपघात घडला. एका भरधाव आलिशान 'BMW M340i' कारने रस्त्यावरील अनेक वाहनांना एकामागून एक जोरदार धडक दिली. या धडकेमुळे अपघातस्थळी एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी पणजी पोलिसांनी तातडीने कारवाई करत कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने गाडी चालवून इतरांच्या जिवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी (Rash and negligent driving) गुन्हा नोंदवला असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. दोनापावला येथील रस्त्यांवर गेल्या दोन महिन्यातील घडलेली ही तिसरी घटना आहे. 

बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा