मालीम-बेती येथे गुन्हा शाखेचा छापा; ८ लाखांचे हेरोईन जप्त

दोघा नेपाळी युवकांना अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
24 mins ago
मालीम-बेती येथे गुन्हा शाखेचा छापा; ८ लाखांचे हेरोईन जप्त

पणजी : गोव्यातील गुन्हे शाखेने (Crime Branch, Goa)  मालीम-बेती येथील मासळी मार्केट परिसरात धडक कारवाई करत सुमारे ८ लाख रुपये किमतीचे ३९.८८ ग्रॅम हेरोईन जप्त केले. आणि दोघा नेपाळी युवकांना अटक केली. 

अटक करण्यात आलेल्यांची नावे अर्जुन बिश्वकर्मा (३६) आणि चेतकांत ओली (२५) अशी असून, दोघेही नेपाळ येथील रहिवासी आहेत. गुन्हा शाखेला खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

संशयितांकडून अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे ८ लाख रुपये असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा