
पणजी : बंगळुरू, कर्नाटक येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ (Art of living) आश्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी भेट दिली. आणि या ठिकाणी आयोजित केलेल्या वैदिक पूजेत सहभागी झाले.
मुख्यमंत्र्यांनी परमपूज्य श्री श्री रवी शंकर (Shri Shri Ravi Shankar) यांचे आशीर्वाद घेतले. आश्रमातील अध्यात्मिक वातावरण, भारतीय संस्कृतीतील शाश्वत परंपरा आणि मूल्यांचा अनुभव अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. अशा सकारात्मक वातावरणात मनःशांती, आत्मविश्वास आणि अंतर्गत शक्ती प्राप्त होते, असेही त्यांनी नमूद केले. भारताच्या प्राचीन अध्यात्मिक वारशाचे जतन आणि प्रसार करण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.