बर्च आग प्रकरण; लूथरा बंधू, अजयच्या जामीनाला गोवा सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान

१५ जून रोजी पुढील सुनावणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
20th May, 02:22 pm
बर्च आग प्रकरण; लूथरा बंधू, अजयच्या जामीनाला गोवा सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान

पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमीओ लेन नाईटक्लबमधील (Birch by Romeo Lane nightclub in Arpora, Goa )  आग दुर्घटना प्रकरणात गोवा सरकारने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात (High Court) धाव घेत याप्रकरणातील संशयितांना मंजूर केलेला जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित सौरभ लूथरा, गौरव लूथरा आणि अजय गुप्ता यांना दिलेल्या जामीन आदेशाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान देऊन ही मागणी केली आहे. 

हणजूण पोलिसांनी (Anjuna Police)  नोंदवलेल्या आग दुर्घटना  प्रकरणात बर्च नाईटक्लबच्या संचालकांना जामीन देणे योग्य नसल्याचे सरकारने आपल्या याचिकेत म्हटले आहे. या भीषण दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्याने हे अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरण असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

उच्च न्यायालयाने याप्रकरणी तिन्ही संशयितांना नोटीसा बजावल्या असून; पुढील सुनावणी १५ जून रोजी निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा