कॉमर्स विषयासाठी सर्वाधिक २८ पदे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी सरकारी महाविद्यालयामध्ये कंत्राटी व व्याख्याते तत्त्वावर २६५ पदे भरली जाणार आहेत. साहाय्यक प्राध्यापक, समुपदेशक, ग्रंथपाल पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविणारी जाहिरात जारी करण्यात आली आहे.
सरकारी महाविद्यालय साखळी, सरकारी महाविद्यालय खांडोळा, सरकारी महाविद्यालय केपे, संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय विर्नोडा, सरकारी महाविद्यालय मडगाव, गृहविज्ञान महाविद्यालय कांपाल व संगीत महाविद्यालय आल्तिनो या महाविद्यालयांत ही पदे भरली जाणार आहेत. बायोटेक्नोलॉजी, बॉटनी, बिझनेस लॉ, ऑर्गेनिक केमिस्ट्री, इनऑर्गेनिक केमिस्ट्री, कॉमर्स, कॉम्प्युटर सायन्स, इकोनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इंग्लिश, हिंदी, जॉग्राफी, जीओइन्फॉमेटिक्स, जीओलॉजी, हिस्ट्री, कोकणी, मराठी, मॅथेमेटिक्स, मायक्रोबायोलॉजी, मॅनेजमेंट, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, सोशिओलॉजी, स्पोर्टस सायन्स, झुओलॉजी, फूड न्युट्रिशन, टेक्स्टाईल अॅण्ड क्लोथिंग, ह्युमन डेव्हलपमेंट, तबला, हार्मोनियम, वोकल, थिएटर आर्टस, लायब्ररियन, शारीरिक शिक्षण संचालक, महाविद्यालय समुपदेशक अशी पदे आहेत. कॉमर्स विषयासाठी सर्वाधिक २८, तर कॉम्प्युटर सायन्स विषयासाठी १८ कंत्राटी पदे आहेत. महाविद्यालय समुपदेशकाची १० पदे कंत्राटी स्वरूपाची आहेत.
अर्ज २६ मेपर्यंत सादर करणे आवश्यक
उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांना इ-मेल येईल. हा इ-मेल आल्यानंतर पूर्ण भरलेले अर्ज प्रमाणपत्रासह (हार्ड कॉपी) २६ मेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. राखीवतेबाबत गोवा सरकारचे जे नियम आहेत, त्यांची कार्यवाही होईल. मुलाखतीची तारीख व स्थळ इ-मेलद्वारे कळविण्यात येईल.