वादळी वारा, पावसामुळे भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील घटना : काही भाविक गंभीर जखमी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
12th May, 11:37 pm
वादळी वारा, पावसामुळे भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू

सांगली : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. मोटेवाडी गावाच्या हद्दीत वादळी वारा आणि पावसामुळे ही दुर्घटना घडली. वादळी वारा आणि पावसामुळे एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून (wall collapsed in Sangli) सहा भाविकांचा मृत्यू (six people died) झाला, तर काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. 

जखमींना जतमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. शंकर आबा लोखंडे पाडोझरी, मंगल भाऊसो मोठे पांडोजरी, संजूबाई राम चौधरी पांडोजरी, कोंडीबा गेजगे दरीबडची अशी मृतांची नावे आहेत. यांच्याव्यतिरिक्त आणखी दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. अनेक भाविका गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा मंगळवारी भरली होती. भाविकांची मोठी गर्दी होती. वादळी वारा आणि पावसामुळे भाविकांनी शेडच्या भिंतीलगत आसरा घेतला. पण भिंत चिऱ्याच्या दगडाच्या बांधकामाची होती. वाऱ्याच्या तडाख्याने भिंत कोसळली. त्यामध्ये ६ भाविकांचा मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. इतर १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले आहे. मृतांपैकी तीन जण विजापूर तालुक्यातील, तर तीन जण जत तालुक्यातील आहेत.

जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा मंगळवारी भरली होती. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पण अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे भित कोसळल्याची घटना घडल्याची माहिती प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली आहे. बांधकामावरील पत्रे उडून भिंतीवर पडले, त्यामुळे भित पडली, असे नष्टे यांनी सांगितले.