जुने गोवे येथे कदंब बायपासवर भीषण स्वयंअपघात; चालक गंभीर जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th May, 04:34 pm
जुने गोवे येथे कदंब बायपासवर भीषण स्वयंअपघात; चालक गंभीर जखमी

पणजी : जुने गोवे येथील कदंब बायपासवर सोमवारी दुपारी भीषण स्वयंअपघात झाला. एका वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावरील वीजखांबाला जाऊन धडकली. या अपघातात कुळे येथील चालक शिवम कोलवेकर (२७) हा गंभीर जखमी झाला असून तो कारमध्येच अडकून पडला होता.

घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथकाने तातडीने धाव घेत त्याला बाहेर काढले. शिवमवर सध्या बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून, अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा