मेरशीत सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांच्यावर हल्ला

पोलीस स्थानकात अद्याप तक्रार नाही


08th May, 11:42 pm
मेरशीत सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांच्यावर हल्ला

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मेरशी येथे खारफुटीची कत्तल करण्यासह मातीचा भराव घालणे सुरू असल्याच्या जागेवर शुक्रवारी सायंकाळी सामाजिक कार्यकर्ते तथा वीज खात्याचे कार्यकारी अभियंते काशिनाथ शेट्ये यांच्यावर हल्ला झाला. कोयता दाखवून आपल्याला धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी मारहाणही झाल्याचे काशिनाथ शेट्ये यांनी सांगितले. या विषयी त्यांनी अद्याप पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलेली नाही.
मेरशी येथे अटलसेतू नजीकच्या जागेतील खारफुटी कापण्यासह तेथे मातीचा भराव घालणे सुरू आहे. या प्रकरणी एका याचिकेवर गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सरू आहे. तरीदेखील तेथे खारफुटीची कापणी सुरू आहे. याविषयी पाहणी करण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्यासह डॉम्निक परेरा उपस्थित होते. घटनास्थळी सुमारे शंभर लोक उपस्थित होते. त्यांच्यासमोरच मला मारहाण करण्यात आली.
यापुढे हल्ले सहन केले जाणार नाहीत : शेट्ये
मेरशी येथे झालेल्या हल्ल्यात हल्लेखोर आमदार रूडॉल्फ फर्नांडिस यांचे नाव घेत होते. खारफुटी कापून मातीचा भराव घातला जात असल्याच्या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात २०१८ साली जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेचेर पुढील सुनावणी जून महिन्यात होणार आहे. यापुढे अशा प्रकारची धमकी वा हल्ले आम्ही सहन करणार नाही, असा इशारा काशिनाथ शेट्ये यांनी दिला आहे.