७ वर्षाच्या मुलीचा विनयभंग प्रकरणी ५८ वर्षीय संशयिताला अटक

म्हार्दोळ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
७ वर्षाच्या मुलीचा विनयभंग प्रकरणी ५८ वर्षीय संशयिताला अटक

फोंडा : म्हार्दोळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विठ्ठल भारू सांबरेकर (५८, बेळगाव) या संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. निरीक्षक योगेश सावंत या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

म्हार्दोळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तीने एका ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. यासंबंधी पालकांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी त्वरित विठ्ठल भारू सांबरेकर याला अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता संशयिताला ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.