गोविंद शिरोडकर यांच्यावर गुन्हा दाखल

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd May, 10:05 pm
गोविंद शिरोडकर यांच्यावर गुन्हा दाखल

पणजी : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या एका भाषणातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून म्हापसा पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ता गोविंद शिरोडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून त्यांना चौकशीसाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांवर पोलिसांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून समाजात तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह विधानानंतर म्हापसा पोलिसांची कारवाई

या प्रकरणी खोर्ली-म्हापसा येथील सुजन नाईक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, चिंबल-तिसवाडी येथील संशयित गोविंद शिरोडकर यांनी एका भाषणावेळी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोन धर्मांमध्ये शत्रुत्व आणि द्वेष पसरवण्याच्या तसेच तक्रारदार आणि समाजातील इतर नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदाराने पुराव्यासाठी व्हिडिओची क्लिपही पोलिसांकडे सुपूर्द केली आहे.

धार्मिक द्वेष पसरवल्याच्या तक्रारीनंतर चिंबल येथील शिरोडकर यांच्यावर गुन्हा

या तक्रारीची गंभीर दखल घेऊन म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक नवीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराज कोरगावकर यांनी शिरोडकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६ आणि २९९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, शिरोडकर यांना नोटीस जारी करून पोलीस स्थानकात हजर राहण्यास सांगितले आहे. पोलीस आता या व्हिडिओच्या मूळ स्रोताचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत पोलिसांकडून चौकशीसाठी नोटीस जारी

#MapusaNews #GovindShirodkar #GoaPolice #SocialMediaScandal #ReligionControversy #GoaNews #BreakingNews #MarathiNews
हेही वाचा