मुदतवाढीनंतर बोडगेश्वराचा नवस फेडणाऱ्या महिला अभियंत्याचा राजीनामा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
मुदतवाढीनंतर बोडगेश्वराचा नवस फेडणाऱ्या महिला अभियंत्याचा राजीनामा

गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात (पीडब्ल्यूडी) कार्यरत असलेल्या सहायक अभियंता रश्मी मयेकर यांनी मुदतवाढ संपण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खात्यात चर्चा रंगली आहे. वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. काल त्यांनी आपला राजीनामा प्रधान मुख्य अभियंत्याकडे सुपूर्द केला.


रश्मी मयेकर या गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होत्या. डिसेंबर महिन्यात त्यांना सेवेत एका वर्षांची मुदतवाढ मिळाली होती. ही मुदतवाढ मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या श्रद्धास्थान असलेल्या देव बोडगेश्वराच्या चरणी सुवर्णहार अर्पण करून नवस फेडला होता. त्यावेळी त्यांच्या श्रद्धेची आणि सेवाभावाची मोठी चर्चा झाली होती.

पण ही मुदतवाढ पूर्ण होण्यापूर्वीच मयेकर यांनी राजीनामा सादर केला.

हेही वाचा