
तेहरान : मध्यपूर्वेतील तणावग्रस्त परिस्थितीत सकारात्मक बदल झाल्याने; आता अमेरिका-इस्त्रायल-इराण यांच्यामधील तणाव कमी होत आहे. होर्मुझ सामुद्रधुनी ( Strait of Hormuz) पुन्हा खुली झाल्यानंतर जहाजांची वाहतूक सुरू झाली आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या समुद्री मार्गावर पुन्हा वर्दळ सुरू झाल्याने जागतिक बाजारपेठेत स्थैर्याचे संकेत मिळत आहेत.
अमेरिका-इराण (US-Iran) तणावाच्या पार्श्वभूमीवर काही काळ विस्कळीत झालेली सागरी वाहतूक आता पूर्ववत होत आहे. तेल आणि इतर ऊर्जा स्रोतांच्या पुरवठ्यावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामुद्रधुनी पुन्हा खुली झाल्यानंतर जहाजांची नियमित ये-जा सुरू झाली असून, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हा दिलासा मानला जात आहे.
विशेषतः ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या मार्गावरील जहाजांची वाहतूक सुरळीत झाल्याने; जागतिक आर्थिक स्थितीत काही प्रमाणात स्थिरता येण्याची अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.