टीसीएस नाशिक छळ प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा जामिनासाठी 'प्रेग्नन्सी'चा दावा

एचआर प्रमुखासह ७ जणांना अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16 mins ago
टीसीएस नाशिक छळ प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा जामिनासाठी 'प्रेग्नन्सी'चा दावा

नाशिक :नाशिक येथील 'टाटाकन्सल्टन्सी सर्व्हिसेस'(TCS) च्या बीपीओ युनिटमध्येघडलेल्या कथित लैंगिक छळ आणिसक्तीच्या धर्मांतर प्रकरणामुळेसंपूर्ण देशात खळबळ उडालीआहे. या प्रकरणातीलमुख्य संशयितांपैकी एक असलेलीनिदा खान हिने आता अटकेपासूनवाचण्यासाठी नाशिक न्यायालयातधाव घेत अटकपूर्व जामिनासाठीअर्ज केला आहे. आपणगरोदर असून पहिल्या अपत्याचीप्रतीक्षा करत असल्याचे सांगततिने वैद्यकीय कारणास्तवदिलासा देण्याची मागणी केलीआहे.


फेब्रुवारी२०२२ ते मार्च २०२६ या कालावधीतनाशिकच्या टीसीएस कार्यालयातमहिला कर्मचाऱ्यांचा मानसिकआणि लैंगिक छळ झाल्याच्यातक्रारी समोर आल्या आहेत.नाशिकचे पोलीस आयुक्तसंदीप कर्णिक यांनी दिलेल्यामाहितीनुसार, याप्रकरणीआतापर्यंत ९ गुन्हे (FIR) दाखलकरण्यात आले आहेत. यातएका पुरुष कर्मचाऱ्यानेत्याच्यावर सक्तीने धर्मांतारकरण्याचा आरोप केला आहे.तपासात धक्कादायकबाब समोर आली की, वरिष्ठपदावर असलेले कर्मचारी आपल्याअधिकाराचा गैरवापर करून महिलासहकाऱ्यांना हॉटेलवर येण्यासाठीदबाव टाकत असत. तसेच,लग्नाचे आमिष दाखवूनशारीरिक शोषण केल्याचेहीगंभीर आरोप करण्यात आले आहेत.


या संपूर्णप्रकरणात कंपनीच्या एचआरचीभूमिका सर्वात धक्कादायकठरली आहे. अटक करण्यातआलेल्यांमध्ये एचआर प्रमुखआणि ऑपरेशन्स मॅनेजर अश्विनीचैनानी यांचा समावेश आहे.तक्रारदार महिलेनेजेव्हा लैंगिक छळाची तक्रारकेली, तेव्हा चैनानीयांनी "अशा गोष्टीघडतच असतात" असेम्हणत प्रकरणावर पडदा टाकण्याचाप्रयत्न केला आणि संशयितांचीचबाजू घेतल्याचा ठपका पोलिसांनीठेवला आहे.


पोलिसांनीस्थापन केलेल्या विशेष तपासपथकाने आतापर्यंत सात जणांनाबेड्या ठोकल्या आहेत. यातअश्विनी चैनानी यांच्यासहदानिश शेख, तौसीफअत्तार, रझा मेमन,शाहरुख कुरेशी, शफीशेख आणि आसिफ आफताब अन्सारीयांचा समावेश आहे. निदाखान सध्या फरार असून तिनेमुंबईतून आपला अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला आहे. तिच्यागरोदरपणाच्या दाव्याची पोलीसआता वैद्यकीय तपासणी करणारआहेत.



टाटा सन्सचेअध्यक्ष एन. चंद्रशेखरनयांनी या घटनेचा तीव्र निषेध  नोंदवला असून, "याघटना अत्यंत चिंताजनक आणिक्लेशदायक आहेत," अशाशब्दांत आपल्या भावना व्यक्तकेल्या आहेत. कंपनीनेसर्व संशयित कर्मचाऱ्यांनातातडीने निलंबित केले असून,मुख्य कार्यकारीअधिकारी आरती सुब्रमण्यनयांच्या नेतृत्वाखाली अंतर्गतचौकशी सुरू केली आहे. तसेचराष्ट्रीय महिला आयोगानेहीया प्रकरणाची दखल घेत एकतथ्यशोधन समिती नियुक्त केलीआहे. सध्या नाशिकपोलीस या प्रकरणातील संघटितगुन्हेगारीचा आणि धर्मांतररॅकेटचा सखोल तपास करत आहेत.

हेही वाचा