नितीश कुमार यांनी घेतली राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ

एनडीएकडून १४ एप्रिलला नव्या मुख्यमंत्र्याची निवड होण्याची शक्यता

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10th April, 01:45 pm
नितीश कुमार यांनी घेतली राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ

नवी दिल्ली : बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज  शुक्रवारी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन ( C. P. Radhakrishnan)  यांनी त्यांच्या कक्षात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांना शपथ दिली. एनडीएकडून १४ एप्रिल रोजी बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नितीश कुमार यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. या वेळी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा ( J. P. Nadda), अर्थमंत्री‌ निर्मला सीतारामन ( Nirmala Sitharaman) तसेच कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल ( Arjun Ram Meghwal) उपस्थित होते.

कार्यक्रमाला जेडीयूचे कार्याध्यक्ष संजय कुमार झा (Sanjay Kumar Jha), काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) आणि भाजप खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी ( Rajiv Pratap Rudy)  यांचीही उपस्थिती होती.

राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारताच नितीश कुमार यांच्या दिल्लीतील राजकारणातील नव्या अध्यायाला सुरूवात झाली आहे. आता एनडीएकडून १४ एप्रिल रोजी बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा