टॉय कारने बॉम्बस्फोटाचा कट; मुंबईत दोघा दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांची महाराष्ट्र एटीसएच्या मदतीने कारवाई

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
48 mins ago
टॉय कारने बॉम्बस्फोटाचा कट; मुंबईत दोघा दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली / मुंबई: देशभरात राबवण्यात आलेल्या व्यापक दहशतवादविरोधी (Anti-Terrorist) कारवाईत मोठा कट उघडकीस आला आहे.  मुंबईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे कथितपणे ‘इस्लामिक स्टेट (IS)’ प्रेरित दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित आहेत. रिमोट कंट्रोल खेळण्यांच्या कारच्या साहाय्याने बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने  (Delhi Police’s special cell)  महाराष्ट्र एटीएसच्या (Maharashtra Anti-Terror Squad (ATS))  मदतीने ही कारवाई केली. मुंबईतील कुर्ला आणि खडवली परिसरात छापे टाकून मोस्साब अहमद उर्फ कलाम आणि मोहम्मद हमाद यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून आक्षेपार्ह साहित्य, संवेदनशील दस्तऐवज आणि चॅट्स जप्त करण्यात आले आहे.  ते स्फोटके तयार करण्याच्या प्रक्रियेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

 कटाचा उलगडा कसा झाला?

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कुर्ला, शिवाजीनगर आणि गोवंडी परिसरातील काही युवकांचा बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संपर्क असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दोन दिवस चाललेल्या कारवाईत तीन ठिकाणी झडती घेण्यात आली आणि संबंधितांच्या मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करण्यात आली.

ऑनलाईन कट्टरवादी गटांशी संबंध 

तपासात उघड झाले की, आरोपी ‘मिशन खिलाफत’ आणि ‘सोल्जर्स ऑफ जिहाद’ या ऑनलाईन गटांशी जोडले गेले होते. त्यांचे संबंध अबू हुफ़ेइजा नावाच्या व्यक्तीशी असल्याचेही समोर आले आहे, जो ‘जैश-ए-मोहम्मद (JeM)’शी संबंधित असून; सोशल मीडियावर आयएस (IS) भरती करणारा  म्हणून कार्यरत असल्याचा संशय आहे.

अल्पवयीन मुलांवर आयएसचा प्रभाव 

विशेष म्हणजे, मुंबईतील (Mumbai) ४-५ अल्पवयीन मुलांवरही आयएसच्या ( IS)  प्रचाराचा प्रभाव पडल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे.  ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.

 देशभरात अलर्ट; स्लीपर सेल शोधण्यावर भर

या कारवाईनंतर केंद्र व राज्य सुरक्षा यंत्रणांनी देशभरात उच्च सतर्कता जाहीर केली आहे. या मॉड्यूलचे इतर सदस्य, त्यांचे हँडलर्स आणि संभाव्य ‘स्लीपर सेल’ शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे.

आधीच्या कारवायांशी संबंध

या प्रकरणाचा संबंध उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे अटक करण्यात आलेल्या रिझवानशीही जोडला जात आहे. तसेच, बांगलादेशस्थित लष्कर-ए-तोयबा (LeT) मॉड्यूलच्या अलीकडील कारवाईच्या पार्श्वभूमीवरही ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.

रेड फोर्ट स्फोटानंतर सुरक्षा कडक

गेल्या वर्षी झालेल्या लाल किल्ला कार बॉम्ब स्फोटानंतर, ज्यात १३ जणांचा मृत्यू झाला होता. देशातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या नव्या कटाचा भंडाफोड करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे.


हेही वाचा