
नाशिक : बहुचर्चित अशोक खरात फसवणूक प्रकरणात तपासाला वेग आला असून; आता या प्रकरणात आणखी एक महिला अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेष तपास पथक (SIT) आणि नाशिक पोलिसांच्या संयुक्त चौकशीत या महिला अधिकाऱ्याची भूमिका तपासली जात आहे.
अशोक खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत (Police Custody) असून; त्याच्याकडून सातत्याने नवीन माहिती समोर येत आहे. एका वेगळ्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी चौकशीचा वेग वाढवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये कार्यरत असताना संबंधित महिला अधिकाऱ्याने प्रशासकीय पातळीवर अशोक खरातला मदत केल्याचा संशय आहे. त्याबदल्यात खरातने आपल्या संपर्कांचा वापर करून त्या अधिकाऱ्याला इच्छित ठिकाणी बदली मिळवून दिल्याची बाब उघड झाली आहे.
महिला अधिकाऱ्याचा तपास सुरू
तसेच, या महिला अधिकारी आणि अशोक खरात (Ashok Kharat) यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचेही प्राथमिक तपासात संकेत मिळाले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत अधिक वाढली असून; पुढील चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या एसआयटी (SIT) आणि नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असून; संबंधित महिला अधिकाऱ्याची भूमिका नेमकी काय होती, याचा तपास सुरू आहे.