अणुप्रकल्पावरील हल्ल्यामुळे संपूर्ण आखात नष्ट होणार!; इराणचा जगाला इशारा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
40 mins ago
अणुप्रकल्पावरील हल्ल्यामुळे संपूर्ण आखात नष्ट होणार!; इराणचा जगाला इशारा

तेहरान : इस्त्रायल-अमेरिकेकडून (Israel-USA) बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाला (Nuclear Project)  लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे इराण (Iran) संतापला आहे. बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पातून शत्रूच्या हल्ल्यामुळे किरणोत्सर्ग झाला तर केवळ इराणच नव्हे तर संपूर्ण आखात विनाशाच्या खाईत लोटणार व त्यात एकही माणूस जिवंत राहणार नसल्याचा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी जगाला दिला आहे.

अमेरिका व इस्रायलने सर्व शक्ती वापरून ही इराण नमते घेत नसल्याने हे दोन्ही देश बेभान झाले आहेत. इराणातील तेल, वीज निर्मिती केंद्रे, खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पांसह अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले जात आहे. इराणातील बुशेहर अणुप्रकल्पावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. इस्त्रायल व अमेरिका यांच्या घातकी कृत्यावर जागतिक पातळीवरील इतर देश शांत आहेत.

त्यामुळे अब्बास अराघची संतप्त बनले आहेत. युक्रेन, रशियाचा दाखला देत त्यांनी पाश्चात्य राष्ट्रांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. रशियाने युक्रेनमधील झापोरेझिया अणुप्रकल्पावर हल्ला करताच पाश्चात्य राष्ट्रांनी ओरड सुरू केली. मात्र, अमेरिका -इस्त्रायलने इराणी अणुप्रकल्पांवर हल्ले करून ही सर्व देश शांत असल्याचे अराघची यांनी म्हटले आहे.

हेही वाचा