लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, मायना कुडतरी पोलिसांकडून संशयिताला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th April, 11:37 pm
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, मायना कुडतरी पोलिसांकडून संशयिताला अटक

मडगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीचे लैंगिक शोषण केल्याची घटना मायना कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पीडितेच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित यशवंत यल्लप्पा हरिजन (२६, रा. रुमडामळ हाऊसिंगबोर्ड, मूळ बेळगाव, कर्नाटक) याच्यावर गुन्हा नोंद करत अटक केली.

संशयित यशवंत हरिजन (२६, रा. रुमडामळ दवर्ली) याने पीडित १७ वर्षीय युवतीशी मैत्री करत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयिताने पीडितेला लग्न करण्याचे आमिष दाखवत १० ऑगस्ट २०२५ ते ३ मार्च २०२६ या कालावधीत तिला फिरायला नेत अनेकदा लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पीडितेच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मायना कुडतरी पोलीस स्थानकात धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मायना कुडतरी पोलिसांनी लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तसेच फसवणुकीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. याप्रकरणी मायना कुडतरी पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनल गावकर पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा