बिहारातील शितला देवी मंदिरात चेंगराचेंगरी : ९ भाविकांचा मृत्यू

सरकारकडून मदतीची घोषणा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
19 mins ago
बिहारातील शितला देवी मंदिरात चेंगराचेंगरी : ९ भाविकांचा मृत्यू

नालंदा (बिहार) : बिहारमधील (Bihar)  नालंदा जिल्ह्यातील शितला देवी मंदिरात (Temple0 मंगळवारी प्रार्थनेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ९ भाविकांचा मृत्यू झाला असून; अनेक जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ६ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद मोदी ( Narendra Modi)  यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंदिर तात्पुरते बंद केले आहे. स्थानिकांनी मात्र मंदिरात गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप केला आहे. दर मंगळवारी माघडा गावातील या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश बिहारच्या मुख्य सचिवांना देण्यात आले असून; लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी (Samrat Choudhary)  यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा