कान कापलेल्या स्थितीतील मृतदेह प्रकरण; म्हापसा पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
15 mins ago
कान कापलेल्या स्थितीतील मृतदेह प्रकरण; म्हापसा पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद

म्हापसा  : बोडगिणी, म्हापसा (Mapusa) येथे कान कापलेल्या स्थितीत आढळलेल्या अज्ञात (Unknown)  इसमाच्या मृतदेहप्रकरणी म्हापसा पोलिसांनी (Mapusa Police)  आता खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. शवचिकित्सा अहवालाच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम (BNS) १०३ अन्वये पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून; मयताची ओळख तसेच अनोळखी संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.

शनिवारी २८ मार्च रोजी सकाळी ८ च्या सुमारास बोडगिणी म्हापसा येथे मरडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या शेतात मयताचा मृतदेह सापडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला होता. मृताचा एक कान कापलेला होता. तसेच चेहरा आणि डोक्यावर गंभीर जखमा होत्या. प्राथमिक पाहणीत हा प्रकार घातपाताचा असल्याचे दिसून आले होते.

शवचिकित्सा अहवालात हा  हत्येचा प्रकार असल्याचे समोर आल्यामुळे पोलिसांनी सोमवारी उशिरा या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद केला.मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र पोलीस विविध दृष्टीकोनातून तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून; त्याद्वारे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक नवीन देसाई हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

हेही वाचा