युद्धाचा परिणाम; रुपयाची घसरण; डॉलरसमोर ९३.०८ वर पोहोचला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
53 mins ago
युद्धाचा परिणाम; रुपयाची घसरण; डॉलरसमोर ९३.०८ वर पोहोचला

मुंबई : इराण (Iran), इस्त्रायल (Israel), अमेरिका (USA) यांच्यामधील युद्धामुळे (War) कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने; त्याचा फटका भारतीय (Indian)  रुपयाला बसला आहे. भारतीय रुपयाने शुक्रवारी (२० मार्च ) डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक घसरण नोंदवत प्रथमच ९३ चा टप्पा ओलांडला. सुरूवातीच्या व्यवहारात रुपया १९ पैशांनी घसरून ९३.०८ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला.

आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया ९२.९२ वर उघडला होता; मात्र नंतर तो घसरत ९३ च्या पुढे गेला. यापूर्वी बुधवारी (१८ मार्च) रुपया ४९ पैशांनी घसरून ९२.८९ या पातळीवर बंद झाला होता. दरम्यान, गुढी पाडव्यानिमित्त गुरुवारी (१९ मार्च) बाजार बंद होता.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे दबाव

तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे रुपयावर दबाव वाढला आहे. तसेच पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे परकीय गुंतवणूकदारांचा (FII) सतत होणारा निधी बाहेर पडत असल्याने रुपयाची घसरण अधिकच तीव्र झाली आहे.

याशिवाय, डॉलरची ताकद वाढल्यानेही रुपयावर परिणाम झाला. डॉलर निर्देशांक सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत ०.१७ टक्क्यांनी वाढून १००.२५ वर पोहोचला. ब्रेंट क्रूडचा दर मात्र १.६४ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल १०६.९ डॉलरवर व्यवहार करत होता.

दरम्यान, देशांतर्गत शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात झाल्यामुळे रुपयाची घसरण आणखी वाढण्यापासून काही प्रमाणात रोखली गेल्याचे विदेशी चलन बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा