
पणजी : गोव्यातील (Goa) ‘ऋषी’ या लघुपटाची दोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी (International film festival) निवड झाली आहे. २२ मार्च रोजी अमेरिकेतील (USA) इलिनॉय येथे होणाऱ्या आर्ली थिएटर शॉर्ट फिल्म फेस्टमध्ये या लघुपटाची निवड झाली आहे. त्याचबरोबर २६ ते २८ मार्च दरम्यान बांगलादेशातील (Bangladesh) मेरन येथे आयोजित रिश्का फेस्टमध्ये हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
मारियो पिमेंटा आणि अॅनालिसा रॉड्रिग्ज दिग्दर्शित 'ॠषी' लघुपट हा कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय) मध्ये आयोजित रुपंतर चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या ५ लघुपटांपैकी एक आहे. हा लघुपट विविध सामाजिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून वैविध्यपूर्ण कथा मांडणारा म्हणून ओळखला जात आहे.
दरम्यान, या लघुपटाची निवड दोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी झाल्याने, लघुपटाचे निर्माता, दिग्दर्शक, कलाकार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.