इराणला आजची रात्र ठरणार ‘काळरात्र’ : अमेरिका

इराण म्हणतेय शेवटच्या गोळीपर्यंत लढणार : जगभरात खळबळ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
इराणला आजची रात्र ठरणार ‘काळरात्र’ : अमेरिका

वॉशिंग्टन: इराण-इस्त्रायल-अमेरिका(Iran-Israel-America) यांच्यामधीलयुद्धाला आठ दिवस झाले आहेत.युद्ध आणखी भडकण्याचीचिन्हे दिसत आहेत. तीनहीदेश मागे हटण्यास तयार नाहीत.त्यामुळे युद्धाची(War) तीव्रता वाढणारव युद्ध लांबणार असल्याचेदिसत आहे. हे युद्धआणखी पेटणार असून, आजचीरात्र इराणला ‘काळरात्र’ठरणार असल्याचा इशारा अमेरिकेनेदिला आहे. इराणचाआरपारच्या लढाईचा इरादा आहे.मागे न हटता शेवटच्यागोळीपर्यंत लढण्याचा इशाराइराणने दिला आहे.

अमेरिकेनेइराणला विनाअट शरण येण्याचाइशारा दिला होता. मात्र,त्याला न जुमानताइराणने आरपारच्या लढाईचाइरादा स्पष्ट करीत शेवटच्यागोळीपर्यंत लढण्याचा निर्धारजाहीर केला. त्यामुळेअमेरिका संतापली असून,त्यांनी आजची रात्रइराणला ‘काळरात्र’ ठरणारअसल्याचा व आतापर्यंतचा सर्वातमोठा हल्ला करणार असल्याचीघोषणा करीत इराणवरील दबाव वाढवला आहे. त्यामुळेजगभरात खळबळ माजली आहे.

अमेरिकेचेअर्थमंत्री स्कॉट बेसेंटयांनी आतापर्यंतचा सर्वातभीषण हल्ला इराणवर करणारअसल्याचा इशारा दिला आहे.इराणच्या क्षेपणास्त्रक्षमतेवर अमेरिकेचे सैन्यहल्ला करीत असून, दोनआघाड्यांवर प्रभावी मोहीमसुरू असल्याचा दावा त्यांनीकेला आहे. इस्रायलव अमेरिकेचे इराणवर संयुक्तहल्ले सुरू आहेत. इराणहीप्रतिहल्ले करीत आहे.अमेरिकेने आता आपलीलष्करी कारवाई अधिक कडक करण्याचानिर्णय घेतला आहे. आजचीरात्र इराणसाठी अत्यंत विनाशकारीठरणार असल्याचे अर्थमंत्रीबेसेंट यांनी एका कार्यक्रमातबोलताना सांगितले.

राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प, संरक्षणसचिव पीटर हेग्सेथ आणि जनरलकेन यांनी म्हटल्याप्रमाणेआज रात्री आमची आतापर्यंतचीसर्वात मोठी बॉम्बफेक मोहीमअसणार असल्याचे बेसेंट यांनीस्पष्ट केले.

शेवटच्यागोळीपर्यंत लढणार : इराण

इराणचेउपपरराष्ट्रमंत्री सईदखतीबजादेह यांनी सांगितलेकी, अमेरिका,इस्त्रायलने केलेल्याहल्ल्याला तोंड देऊन देशाचेरक्षण करण्यासाठी लढण्याशिवायदुसरा कोणताही अन्य पर्यायनाही. शेवटच्यासैनिकापर्यंत आणि शेवटचीगोळी असेपर्यंत देश लढत राहणारअसल्याची आम्ही शपथ घेतलीआहे. लढण्याचानिर्धार केला असल्याचे खतीबजादेहयांनी दिल्लीत सुरू असलेल्या’रायसीना डायलॉग’मध्येसांगितले.

इराणमध्येअमेरिकेने सैन्य घुसवल्यासजमिनीवरील युद्धासाठी इराणसज्ज आहे. शस्त्रसंधीचाप्रश्नच उद्भवत नसल्याचेइराणचे परराष्ट्रमंत्रीअब्बास अराग्यची यांनी स्पष्टकेले. इराण विरोधातउभे ठाकलेल्यांना यापुढेगंभीर परिणाम भोगावे लागणारअसल्याचा इशारा इराणचेराष्ट्राध्यक्ष मसूद पझाश्कियानयांनी दिला आहे.



हेही वाचा