युद्धाचा फटका; घरगुती, व्यावसायिक सिलिंडर महागला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
33 mins ago
युद्धाचा फटका; घरगुती, व्यावसायिक सिलिंडर महागला

नवी दिल्ली : इराण-इस्त्रायल-अमेरिका (Iran-Israel-America) युद्धामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. जागतिक पातळीवर ऊर्जा संकट गडद होऊ लागले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात (India) घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किमती वाढवण्यात आल्या आहेत. घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा सिलिंडर ६० रुपयांनी तर १९ किलो वजनाचा गॅस सिलिंडर ११५ रुपयांनी महाग झाला आहे. शनिवार ७ मार्च पासून ही दरवाढ लागू झाली आहे. 

घरगुती गॅस सिलिंडरची किंमत वाढल्याने त्याचा फटका गृहिणीसहीत सर्वांनाच बसणार आहे. रेस्टॉरंट, हॉटेल (Hotel) आणि छोटे व्यावसायिक वापरत असलेल्या १९ किलोच्या सिलिंडरमध्ये ११५ रुपयांची वाढ झाली आहे. गॅस सिलिंडर वाढल्याने हॉटेलमधील जेवण व खाद्यपदार्थ महाग होणार व त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.

देशात इंधनाचा तुटवडा नाही

दरवाढ करण्यात आली असली तरी, सरकारने देशात इंधनाचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. देशात ऊर्जेचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांना शाश्वत व परवडणारे इंधन उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैस‌र्ग‌िक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आपल्या ट्वीटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. इंधन टंचाईच्या अफवा इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ही फेटाळून लावल्या आहेत.   

हेही वाचा