
पणजी : गोव्यातील (Goa) आल्तो- पर्वरी (Alto- Porvorim) येथे एका निवासी संकुलात बेकायदेशीरपणे लागवड केलेली १.२८ लाखांची हायड्रोपोनिक या उच्च दर्जाची गांजा (Ganja) रोपटी अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) (ANC) जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
जप्त करण्यात आलेल्यात पिशवीत रोपलेली गांजाची पाच रोपटी, १६ ग्राम गांजा व २२ ग्राम हायड्रोपोनिक गांजाच्या रोपट्यांचा समावेश आहे. त्याची एकूण किंमत १ लाख, २८ हजार, ६०० रुपये एवढी आहे.
१७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पर्वरी येथील निवासी संकुलात अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. त्यात वरील गांजाची रोपटी सापडली. प्राथमिक तपासात ही रोपटी कुणीतरी मुद्दामहून लावल्याचे दिसून येताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन तपासानंतर अटक केली.
यासंदर्भात अमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थ व नशिले पदार्थ कायदा ११९८५ च्या कलम २० (ए), २० (बी) (२) (ए) यासह २९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक नेर्लन आल्बुकर्क, पोलीस अधीक्षक सुनिता सावंत, पोलीस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकेश हडफडकर अधिक तपास करीत आहेत.