
नवी दिल्ली : भारतीय स्टेट बॅंकेत (एसबीआय) (SBI) सर्कल बेस्ड ऑफिसर (सीबीओ) (CBO) पदाच्या एकूण २ हजार २७३ पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख या महिन्याची २५ फेब्रुवारी आहे. यापूर्वी १८ फेब्रुवारीला अंतिम तारीख होती. मात्र, आता २५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.
या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर देण्यात आली आहे. विविध राज्यांतून या जागा भरण्यात येणार आहेत. त्यात गांधीनगर १९४, चंदीगड १०३, नवी दिल्ली ७६, चेन्नई १६५, भोपाळ ९७, जयपूर १०३, लखनौ २०० इत्यादी जागांचा समावेश आहे.