झणझणीत मिसळ पाव

Story: चमचमीत रविवार |
07th February, 10:03 pm
झणझणीत मिसळ पाव

साहित्य:

• २ मोठ्या वाट्या उकडलेली मटकी

• १ मोठी वाटी खोबरं (किसलेले)

• २ उभे चिरलेले कांदे

• ४ ते ५ लसूण पाकळ्या

• ४ ते ५ आल्याचे तुकडे

• २ मोठे चिरलेले टोमॅटो

• १ मोठा चमचा धने पूड

• १ मोठा चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला

तिखटानुसार लाल तिखट

• १ मोठी वाटी फरसाण

• बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर (सजावटीसाठी)

• चवीनुसार मीठ

• तेल, पाणी आणि चवीपुरता गूळ

कृती:

 प्रथम गॅसवर कढईत तेल तापत ठेवा. तेल तापले की त्यात उभा चिरलेला कांदा घाला व मऊ होईपर्यंत परतून घ्या. आता यात खोबरं, आलं, लसूण आणि टोमॅटो घाला. खोबऱ्याला सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर यात धने पूड, गोडा मसाला/गरम मसाला आणि लाल तिखट घाला. सर्व मसाल्यांना कडेने तेल सुटेपर्यंत परता. हे मिश्रण पूर्णपणे थंड झाले की त्यात थोडे पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. आता त्याच कढईत ३ ते ४ चमचे तेल गरम करा. तेल गरम झाले की तयार केलेले वाटण घाला. तुम्हाला हव्या असलेल्या घनतेनुसार रश्श्यासाठी त्यात पाणी मिळवा. रश्श्याला एक उकळी आली की त्यात शिजवलेली मटकी, चवीनुसार मीठ आणि थोडा गूळ घाला. एका वाटीत तयार मिसळ/कड घ्या, वरून भरपूर फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला. गरमागरम पावाबरोबर ही झणझणीत मिसळ सर्व्ह करा!


संचिता केळकर