जीपीएससी (GPSC) आणि बँकिंग परीक्षा दोन्ही द्या

गोव्यातील अनेक विद्यार्थ्यांनी स्टाफ सिलेक्शन परीक्षांची तयारी केलेली आहे. जवळपास ८०% अभ्यास त्यांचा झालेला आहे. बँकांच्या प्रीलिम परीक्षेसाठी त्यांना नक्कीच फायदा होईल. प्रोबेशनरी ऑफिसर, क्लार्क या पदांना आजकाल भरपूर पगार दिला जातो.

Story: यशस्वी भव: |
18th April, 11:15 pm
जीपीएससी (GPSC) आणि बँकिंग परीक्षा दोन्ही द्या

​जीपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना जोडीनेच बँकिंग परीक्षेचा सुद्धा अभ्यास होतो. जवळपास परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे, परंतु प्रीलिम्स व मेन्स परीक्षेसाठी जरा यूपीएससी पद्धदा होईल. प्रोबेशनरी ऑफिसर, क्लार्क या पदांना ही.जीपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना जोडीनेच बँकिंग परीक्षेचा सुद्धा अभ्यास होतो. जवळपास परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे, परंतु प्रीलिम्स व मेन्स परीक्षेसाठी जरा यूपीएससी पद्धतीने अभ्यास करावा लागेल. या स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांचा aptitude (कल) कसा आहे हे पहिले समजून घेतले जाते. अभ्यास करून एकवेळ पास होता येईल, परंतु अधिकाऱ्याला काम करण्यासाठी जे अंगभूत कलागुण आवश्यक आहेत, हे पहिल्यांदा तपासून घेतले जाते व त्यासाठी प्री-स्क्रीनिंग अथवा प्रीलिम्स अशा स्वरूपाच्या परीक्षा घेतल्या जातात. ती पास झाली की मग इतर विषयांना हात घालता येतो. जीपीएससीची प्री-स्क्रीनिंग आणि स्क्रीनिंग परीक्षेचा जवळपास ९०% अभ्यासक्रम IBPS अर्थात 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन' मार्फत बँकांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर्स नियुक्त केले जातात, त्यांच्याशी सुसंगत असतो. यामध्ये रिझनिंग अॅबिलिटी, मॅथ्स, न्यूमेरिकल अॅबिलिटी (अंकगणितातील प्राविण्य), लॉजिकल रिझनिंग (विवेकपूर्ण दृष्टीने दिलेले समयोचित उत्तर), इंग्रजी (व्याकरण, पत्रलेखन, शुद्धलेखन, उतारा व त्यावरील प्रश्न) यांचा समावेश असतो.

सारांश काढणे, टेबल्स, ग्राफ्स यांचा यथायोग्य वापर कसा करणे, व्होकॅब्युलरी कशी आहे, निर्णय क्षमता कशी आहे, मानसिक संतुलन कसे आहे? साधारणपणे वैचारिक बैठक कशी आहे? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अॅटिट्यूड आहे की प्रॉब्लेम क्रिएटर आहे, या सर्व गोष्टींचा उलगडा या परीक्षांमधून होतो. आगामी होऊ घातलेल्या बँकिंग परीक्षेला गोमंतकीय विद्यार्थ्यांनी बसायला हरकत नाही. १ जुलै २०२६ ते २१ जुलैपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. ऑगस्टमध्ये प्रीलिम परीक्षा आहे, तर मेन्स परीक्षा ऑक्टोबरमध्ये आहे.

www.ibps.in या संकेतस्थळावर सर्व आवश्यक माहिती उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर भेट द्यावी. हल्ली गोव्यातील अनेक विद्यार्थ्यांनी स्टाफ सिलेक्शन परीक्षांची तयारी केलेली आहे. जवळपास ८०% अभ्यास त्यांचा झालेला आहे. बँकांच्या प्रीलिम परीक्षेसाठी त्यांना नक्कीच फायदा होईल. प्रोबेशनरी ऑफिसर, क्लार्क या पदांना आजकाल भरपूर पगार दिला जातो. स्टाफ सिलेक्शन, जीपीएससी व बँकिंगचा परीक्षा अभ्यासक्रम जवळपास सारखा आहे. तयारी झालेलीच असल्याकारणाने ही संधी कोणी सोडू नये, अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही.


- अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा

(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)