फेब्रुवारी महिन्यातील गोव्यातील विविध मंदिरांच्या जत्रा, वर्धापनदिन यांची माहिती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
51 mins ago
फेब्रुवारी महिन्यातील गोव्यातील विविध मंदिरांच्या जत्रा, वर्धापनदिन यांची माहिती

पणजी : गोवा (Goa) म्हणजे देवभूमी. गोव्यातील कानाकोपऱ्यात विविध देवस्थाने (Temple), श्रद्धास्थाने आहेत. या देवस्थानांत वर्षभर धार्मिक (Religious)  उत्सव, जत्रा, वर्धापनदिन या सारखे भाविकांना एकत्र आणणारे उत्सव होत असतात. गोमंतकीय आवर्जून या उत्सवांना उपस्थिती लावत असतात. गोव्यात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या विविध देवस्थानांच्या जत्रा, वर्धापन दिन खालीलप्रमाणे आहेत. 

४ फेब्रुवारी : पाईकदेव जत्रा, सांगे. श्री माऊली मंदिर वर्धापन दिन मांद्रे. श्री गणपतीदेव वर्धापनदिन, नवेवाडे, वास्को.

५ फेब्रुवारी : म्हालसा जत्रोत्सव प्रारंभ, म्हार्दोळ. हनुमान देवस्थान वर्धापनदिन, पोपटवाडा बाणस्तारी.

६ फेब्रुवारी : शिगमोत्सव (इंत्रुजोत्सव) प्रारंभ डोंगरी. कुळकार वेताळ राष्ट्रोळी पंचायतन देवस्थान वर्धापनदिन पार्से. देवी भूमिका वर्धापनदिन, हणजूण.

७ फेब्रुवारी : श्री सातेरी भगवती जत्रोत्सव, पंचवाडी. श्री महादेव देवस्थान वर्धापनदिन, होडार, कुडचडे.

८ फेब्रुवारी : गजानन महाराज प्रकट दिन. श्रीक्षेत्र पिंपळेश्वर दत्तमंदिर वर्धापनदिन, चिंचोळे, पणजी. श्री लिंगेश्वर वर्धापनदिन, शिरोडा. श्री देवी कात्यायणी देवस्थान वर्धापनदिन, काराभाट, चोडण.

९ फेब्रवारी : श्री देव महेश्वर संस्थान वर्धापनदिन कैलासनगर, अस्नोडा. श्री भूमिका सातेरी रवळनाथ मंदिर वर्धापनदिन गिरी. श्री हनुमान भिंगेश्वर वर्धापनदिन, शिवोली.

१० फेब्रुवारी : श्री भूमिका देवी जत्रा, गिरवडे.

११ फेब्रुवारी : श्री रामदास नवमी उत्सव, समर्थमठ, तीनमाड कुचेली. श्री दत्तगुरु मंदिर वर्धापनदिन तोरसे, पेडणे.

१४ फेब्रुवारी : निळकंठ ब्रम्हेश्वर नवदुर्गा देवस्थान वर्धापनदिन पर्वरी. श्रीरंगाई शांतादुर्गा देवस्थान वर्धापनदिन काले, शिगांव.

१५ फेब्रवारी : महाशिवरात्री. श्री गोमतेश्वर वर्धापनदिन, बायणा सासमोडे. श्री लक्ष्मेश्वर जत्रोत्सव, मुडाय पंचवाडी. श्री महारुद्र देट्टेश्वर देवस्थान वर्धापनदिन, मोवळा कुडका.

१७ फेब्रुवारी : दर्श अमावास्या. श्री जागतेश्वर वर्धापनदिन.

१९ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे).

२० फेब्रुवारी : श्री हनुमान देवस्थान वर्धापनदिन, सुकूर वाडे. श्री कलनाथ सातेरी दूधसागर देवस्थान वर्धापनदिन, सोनावली कुळे. श्री ब्राम्हणी महामाया देवस्थान कलश प्रतिष्ठापना दिन, कोपार्डे. 

२१ फेब्रुवारी : विनायक चतुर्थी. श्री सिद्ध‌िविनायक मूर्तीस्थापना वर्धापनदिन कांगारे बाराजण. श्री साई संस्थान साई मंदिर वर्धापनदिन, गोमुख पणजी.

२२ फेब्रुवारी : श्री सातेरी केळबाय देवस्थान वर्धापनदिन डिचोली, श्री कमलावती देवस्थान वर्धापनदिन गावसभाट करमळी. श्री वनदेवी मुकोबा देवस्थान वर्धापनदिन खोर्ली मळार.

२३ फेब्रुवारी : श्री सातेरी देवस्थान वर्धापनदिन, शिवोली.

२४ फेब्रुवारी : श्री राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान वर्धापनदिन, मुळगाव.

२५ फेब्रुवारी : श्री सातेरी देवस्थान वर्धानपनदिन आरवली शिरोडा,  श्री बेळेवंश कुळकार देवस्थान. वर्धापनदिन, हळीदवाडा, केरी, सत्तरी. 

२६ फेब्रुवारी : श्री शांतादुर्गा पंचायतन देवस्थान वर्धापनदिन, बांध कालापूर.  श्री साईबाबा मंदिर वर्धापनदिन तारीवाडा माशेल.

२७ फेब्रुवारी : आमलकी एकादशी. गडेकर मंदिर वर्धापनदिन, तिरोडा.

२८ फेब्रुवारी : श्री विरेश्वर वर्धापनदिन गुळदुवे.


हेही वाचा