अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद

म्हापसा : तोवरवाडा कोलवाळ येथील सावियो पॉल यांचे बंद घर चोरांनी फोडले. घरातील २० लाखांचे दागिने व दहा हजार रोकड मिळून २० लाख १० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
चोरीची घटना १६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली. फिर्यादी पॉल कुटुंब हे १५ जानेवारी रोजी सायंकाळी घर बंद करून नातेवाईकांकडे गेले होते. दुसर्या दिवशी सकाळी हे कुटुंब घरी परत आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.
घराच्या मुख्य दरवाजावरील कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सर्व कपाटे फोडली व आत असलेले सर्व सुवर्णलंकार आणि १० हजार रोख रक्कम चोरुन नेली. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत २० लाख रुपये होती. घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.
घरमालक फिर्यादी पॉल यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.