काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष प्रतीक्षा खलप यांची मागणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य सरकार १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी आणण्याचा विचार करत आहे. असे करण्याऐवजी लहान मुलांना घातक ठरणाऱ्या कंटेंटवर नियंत्रण आणण्याबाबत विचार करावा, अशी मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष प्रतीक्षा खलप यांनी केली. मंगळवारी पणजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला सरचिटणीस शिल्पी अरोरा, सचिव प्रज्योती हांडोरे व राज्य सचिव अॅड. शबनम खान उपस्थित होत्या.
खलप म्हणाल्या की, मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणे हा उपाय होऊ शकत नाही. बंदी आणली तरी ते नातेवाईकांच्या फोनवरून सोशल मीडिया वापरू शकतात. याऐवजी सरकारने घातक कंटेंटवर बंदी घालावी. सध्या विविध अॅप, वेबसाईटवरून गोव्यातील महिलांवर अश्लील टिप्पणी केली जात आहे. अशा वेबसाईट, अ
अॅपवर बंदी घालणे आवश्यक आहे.
शिल्पी अरोरा म्हणाल्या, राज्य सरकाने गोव्याला १४० वर्षे मागे नेण्याचे काम केले आहे. राज्यात बेरोजगारी, गुन्हेगारी वाढत आहे. खुलेआम अमलीपदार्थांचे व्यवहार होत आहेत. महिला घराबाहेर सुरक्षित नाहीत. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे आवश्यक आहे.
आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू : अरोरा
अरोरा म्हणाल्या की, महिला काँग्रेसतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. आम्ही प्रत्येक बूथमधील महिलांना सक्षम करण्याचे काम करत आहोत. बुथवर व्होट चोरी कशी होऊ द्यायची नाही याचे प्रशिक्षण देत आहोत. निवडणुकीत काँग्रेस जनमानसात स्थान असणाऱ्या महिलांना संधी देणार आहे.