तुम्ही या जगात कोणत्याही गुंतवणुकीशिवाय आला आहात. आणि तुम्ही जाताना कोणतेही भांडवल घेऊन जाणार नाही. या दरम्यान जे काही घडते, त्यामुळे तसेही तुम्ही फायद्याच्याच बाजूला आहात, कारण तुमच्याकडे जे काही आहे ते म्हणजे या जीवनाचा अनुभव.

सद्गुरू : या बाहेरील जगात काहीही निश्चित नाही, हे एक वास्तव आहे. हे जग अनिश्चित आहे आणि हीच गोष्ट त्याला आव्हानात्मक बनवते. अनिश्चितता म्हणजे बदल घडत आहे; दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, तिथे कोणताही साचलेपणा नाही. जर तुम्ही वेगाने चालत असाल, तर प्रत्येक पाऊल म्हणजे एक नवीन भूप्रदेश. याच नवीन भूप्रदेशाला तुम्ही सध्या "अनिश्चितता" म्हणत आहात.
जे लोक संधी शोधत आहेत, त्यांच्यासाठी अनिश्चितता हा सर्वोत्तम काळ आहे. ज्यांच्याकडे दृष्टीकोन आहे, ते एक शक्यता तयार करतील; ज्यांच्याकडे तो नाही, ते याकडे एक समस्या म्हणून पाहतील. पण, तुम्ही तुमच्या मनात सतत आसक्तीपूर्ण प्रतिक्रियेच्या अवस्थेत असल्याने, तुम्ही निश्चितपणा शोधत आहात.
निश्चितता ही एकाच जागी थांबून राहण्याची अवस्था आहे. जर निश्चितता असेल, तर सर्व काही जसे आहे तसे राहील, नाही का? व्यवसायात, राजकारणात, समाजात ‘जशी आहे तशी स्थिती’ म्हणजे काहीही बदल न होणे; काहीही विकसित न होणे. निश्चिततेच्या शोधात, साहजिकच, तुम्ही साचलेपणाकडे जात आहात. जर गोष्टी साचलेल्या असतील, तर तुम्ही कंटाळून जाल. जर गोष्टी वेगाने घडल्या, तर त्या हाताळण्यासाठी तुमच्याकडे संतुलन नसेल. तर, समस्या अनिश्चिततेबद्दल नाही, तर तुमची आंतरिकता अनिश्चित बनली आहे. जर तुम्ही शांत असावे यासाठी संपूर्ण जगाला ठीक करायचे असेल, तर ते कधीच शक्य नाही. त्याऐवजी आपल्याला तुमची आंतरिकता ठीक करावी लागेल. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की, जर तुमची आंतरिकता आसक्तीपूर्ण नसेल, तर तुम्ही प्रत्येक परिस्थिती तुमच्या सर्वोत्तम क्षमतेने हाताळू शकाल. कदाचित ती तुम्ही दुसऱ्यासारखी हाताळू शकणार नाही, पण तुम्ही तुमच्या सर्वोच्च क्षमतेनुसार ती हाताळाल. तुम्ही आसक्तीपूर्ण प्रतिक्रियेच्या अवस्थेत असल्यामुळे, तुम्ही तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमुळे त्रासून जात नाही.
तुमची आंतरिकता ही स्वतःहूनच एक पैलू आहे. ती बाहेरील परिस्थितींनुसार घडवली जाऊ शकत नाही - "सध्या जीवनात निश्चितता आहे, तर मी एका ठराविक प्रकारची आंतरिकता बाळगेन.” "आता अनिश्चितता आहे, म्हणून मी वेगळ्या प्रकारची आंतरिकता बाळगेन." "आसपासचे लोक चांगले वागले, तर मी एक प्रकारची आंतरिकता बाळगेन. जेव्हा लोक वाईट वागतील, तेव्हा दुसऱ्या प्रकारची आंतरिकता बाळगेन," ते अशा प्रकारे काम करत नाही. ही अशी गोष्ट नाही, जी तुम्ही निश्चित करता, तर ती एक अवस्था आहे. तर, ती कशी टिकवायची? ती टिकवून ठेवण्याचा कोणताही मार्ग नाही. जर ती जागरूक असेल, तर ती आसक्तीपूर्ण असणार नाही.
तुम्ही या जगात कोणत्याही गुंतवणुकीशिवाय आला आहात. आणि तुम्ही जाताना कोणतेही भांडवल घेऊन जाणार नाही. या दरम्यान जे काही घडते, त्यामुळे तसेही तुम्ही फायद्याच्याच बाजूला आहात, कारण तुमच्याकडे जे काही आहे ते म्हणजे या जीवनाचा अनुभव. महत्वाची गोष्ट ही आहे की, तुम्ही तो कसा अनुभवता. तर, तुमची आंतरिकता ही आसक्तीरहित, जागरूक अवस्थेत असेल, तर मग, तुमचा अनुभव तुम्ही स्वतः ठरवता. परिस्थितींबाबत, तुम्ही त्यामधला थोडा भाग ठरवता, जग थोडा भाग ठरवते. पण तुम्ही जीवन कसे अनुभवता हे शंभर टक्के तुमच्या हातात आहे.
जर तुम्हाला तुमचे काम महत्त्वाचे वाटत असेल, तर सर्वात आधी तुम्ही स्वतःवर काम केले पाहिजे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या आतमध्ये एक स्थिर व्यक्ती आहात, मग बाहेरील परिस्थिती कशीही असो. जेव्हा तुम्ही एखादा मोठा व्यवसाय किंवा उद्योग चालवत असता, तेव्हा ते केवळ तुमच्यापुरते नसते. अनेकदा, तुमच्यासोबत इतर हजारो लोक सहभागी असतात. त्यामुळे तुम्ही एखादी परिस्थिती कशी हाताळता याचा परिणाम केवळ तुमच्या जीवनावरच नाही, तर इतर हजारो जीवनावर देखील होतो. मी तुम्हाला असा एक मार्ग शिकवू शकतो ज्याद्वारे तुम्ही स्वतःच्या आतमध्ये एक स्थिर आणि आनंदी रसायन निर्माण करू शकाल, जीवनातील सर्व प्रकारचे चढ-उतार हाताळण्याची तुमची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते. कसे? योगाच्या माध्यमातून.
योग तुम्हाला अशी शक्यता देतो की, जर तुम्ही इथे सहज बसलात, तर तुम्ही आणि तुमचे शरीर यामध्ये थोडे अंतर निर्माण होते, तुम्ही आणि तुमचे मन यामध्ये थोडे अंतर निर्माण होते, तुम्ही आणि जग यामध्ये थोडे अंतर निर्माण होते. एकदा का तुम्ही तुमच्या आतमध्ये असे अंतर निर्माण केले, एकदा का तुम्ही हे जाणले की, तुम्ही काय आहात आणि काय नाहीत, मग तो दुःखाचा अंत असतो. जेव्हा दुःखाची भीती उरत नाही, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत स्पष्टतेने पाहू शकता आणि प्रत्येक समस्या तुमच्या सर्वोत्तम बुद्धिमत्तेने व क्षमतेने हाताळू शकता. परिस्थिती कधीही तुम्हाला भांबावून टाकणार नाही.
जेव्हा मी योग म्हणतो, तेव्हा मला मुंबई किंवा एल.ए.मधील स्टुडिओतला किंवा टीव्हीवरचा योग अभिप्रेत नसतो. योगाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. योग आंतरिकतेवर काम करण्याचे ११२ पद्धतशीर मार्ग प्रदान करतो, ज्याद्वारे तुम्ही तुमचे तात्कालिक आणि अंतिम कल्याण साधू शकता. हे एक परिपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. जर तुम्ही दिवसाची ३०-४० मिनिटे दिलीत, तर पुढील सहा महिन्यांत शरीराच्या आणि मनाच्या उत्साहाबाबतीत तुम्ही किमान १० वर्षांनी तरुण व्हाल याची खात्री आम्ही देऊ शकतो. तुमची कार्यक्षमता अशी असेल की, जे काम तुम्ही ८ तासांत करता, ते सहज ४-५ तासांत पूर्ण कराल. जर तुम्ही ८ तास झोपत असाल, तर शरीरावर ताण न पडता, तुम्ही ती सहज ५-६ तासांवर आणू शकता. तर, ही ४० मिनिटांची गुंतवणूक तुम्हाला अतिरिक्त वेळ, अतिरिक्त स्पष्टता, अतिरिक्त शक्यता आणि निश्चितच अतिरिक्त पैसा मिळवून देईल!

- सद्गुरू
(ईशा फाऊंडेशन)