बिग बॅंगच्या पलीकडे - विज्ञान आणि अध्यात्म

जे सध्या चक्राकार फेरी पूर्ण करून येणाऱ्या घटनात्मक पद्धतीने जाणून घेतले जात आहे, ते खूप पूर्वी जाणले गेले होते. जर पुरेसे खोलवर पाहिले तर, प्रत्येक माणूस ते जाणून घेऊ शकतो.

Story: विचारचक्र |
21st December, 11:21 pm
बिग बॅंगच्या पलीकडे - विज्ञान आणि अध्यात्म

सद्गुरू : अलीकडेच, मी प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या एका सादरीकरणात होतो. त्यांनी एंडलेस युनिव्हर्स नावाचे पुस्तक लिहिले आहे. ते वैज्ञानिक वर्तुळात खूप लोकप्रिय झाले आहे. त्यांनी या विशिष्ट सत्राला "बियॉन्ड द बिग बँग" असे नाव दिले, कारण अलीकडेपर्यंत वैज्ञानिक समुदायाचा असा विश्वास होता की बिग बँगमुळे सर्व काही घडले आहे. पण आता काहीजण म्हणत आहेत, "फक्त एकच नाही, अनेक स्फोट झाले असतील." असे मानले गेले होते की, काही अब्ज वर्षांपूर्वी, हा विशिष्ट स्फोट झाला, ज्यामुळे हे सर्व ग्रह आणि हे विश्व निर्माण झाले. पण आता ते म्हणत आहेत की, हा स्फोट एकच नाही.

मी याच्या संपूर्ण विज्ञानात जाणार नाही, पण हे माझ्यासाठी मनोरंजक होते, कारण हे सिद्धांत योग कथांसारखे वाटू लागले आहे. ही अशी गोष्ट आहे, जी आपल्याला आतून नेहमीच माहीत होती. पण हळूहळू ते केवळ योगिक कथांसारखे बोलू लागले नाहीत, तर ते त्याची रूपे आणि आकार यांचे वर्णन करू लागले आहेत, ज्यांना आम्ही नेहमी पवित्र मानले आहे आणि पूजा केली आहे.

योगिक पद्धतीत, आमचा हा विश्वास नाही की, तुम्ही या अस्तित्वाच्या बाहेर जाऊन, तिथे जे काही आहे ते कधी शोधू शकता - असा एक विश्वास जिथे शास्त्रज्ञ देखील पोहोचले आहेत. जेव्हा एखादा शास्त्रज्ञ म्हणतो की, हे अंतहीन विश्व आहे, तेव्हा तो स्पष्टपणे हे म्हणत आहे की, ते काय आहे हे तुम्ही कधीही शोधू शकत नाही. तुम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करून म्हणू शकत नाही, "ठीक आहे, हे अस्तित्व आहे." आम्हाला माहीत आहे की, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करून हे जाणून घेण्याचा कोणताही मार्ग नाही, कारण तुम्ही प्रवास पूर्ण करता तोपर्यंत ते विस्तारले असेल. या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीसाठी, मूलभूत नियम असा आहे की, तुम्ही गाठू शकता असा सर्वोच्च वेग हा प्रकाशाचा वेग आहे. मग तुम्ही जर प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी वेगाने प्रवास केला, तर तुम्ही विश्वाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचता तोपर्यंत, ते खूप वेगाने वाढलेले असेल. तुम्ही कधीही संपूर्ण अंतर प्रवास करू शकत नाही. म्हणूनच आपण म्हणतो की, हे अंतहीन विश्व आहे. आपण कधीही शेवटपर्यंत प्रवास करू शकत नाही. ही अशी गोष्ट आहे जी हजारो वर्षांपूर्वी सांगितली गेली.

लघु-विश्व

आणि म्हणून, या अस्तित्वाला जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आतमध्ये वळणे. अस्तित्वात जे काही घडले आहे, ते सर्व काही या लघु-विश्वात म्हणजेच शरीरात कोणत्या ना कोणत्या प्रकारे नोंदवले आहे. या नोंदीमुळे, अस्तित्वाच्या या प्रतिबिंबामुळे, आपण म्हणालो की, मानव देवाच्या प्रतिमेत निर्माण झाला आहे. ही अभिव्यक्ती जी खूप पूर्वी (हजारो वर्षांपूर्वी) योगिक क्षेत्रात उच्चारली गेली, तिचे प्रतिबिंब प्रत्येक धर्मात चुकीच्या अर्थाने आढळून आले आहे. आपण केवळ हे म्हटले, "अस्तित्वात जे काही घडले आहे ते लहान स्वरूपात तुमच्या आत घडले आहे." जर तुम्हाला हे एक माहीत असेल, तर तुम्हाला बाहेर जे काही घडत आहे ते सर्व माहीत असेल. आम्ही निर्मिती आणि निर्माणकर्ता यांना वेगळे करू शकत नाही. निर्मितीच्या प्रतिमेतच निर्माणकर्ता आहे.

मी तुम्हाला सांगू इच्छितो की योग कशाप्रकारे आतून घडणाऱ्या निर्मितीचे स्पष्टीकरण देतो. ही एक संवादात्मक संस्कृती आहे. जर तुम्हाला हवे असेल, तर मी हे सर्व काही अबक बनवू शकतो, पण आपण संस्कृतीचा आनंद घेऊ या. शब्दावलीत एक विशिष्ट सौंदर्य आहे. कारण ते आपल्या तार्किक आकलनात नसलेल्या आयामाबद्दल सांगत असते, संवादात्मक पद्धतीने बोलणे जास्त चांगले आहे. कथा अशी आहे:

शिव झोपला आहे. जेव्हा आपण येथे "शिव" म्हणतो, तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा योग्याबद्दल बोलत नाही आहोत. येथे "शिव" म्हणजे "जे नाही ते"; जे नवजात आहे. "जे नाही ते" केवळ झोपून राहू शकते. आणि त्याला नेहमी "काळा" म्हणून संबोधले गेले आहे.

शिव झोपला आहे, शक्ती त्याला शोधत येते. तिला त्याने जागे व्हावे असे वाटते, कारण तिला त्याच्यासोबत नाचायचे आणि खेळायचे आहे, त्याला आकर्षित करायचे आहे. सुरुवातीला, तो जागा होत नाही. काही काळानंतर, तो जागा होतो. जो कोणी गाढ झोपेत असतो, जर तुम्ही त्याला उठवले, तर तो थोडा रागावेल. जर तुम्ही गाढ झोपेत आहात आणि कोणीतरी येऊन तुम्हाला धक्का दिला, तर ती व्यक्ती कितीही सुंदर असली तरी काही फरक पडत नाही, तुम्ही रागावाल. म्हणून तो रागावतो, गर्जना करतो आणि उठतो. म्हणूनच त्याचे पहिले रूप आणि त्याचे पहिले नाव रुद्र आहे. "रुद्र" या शब्दाचा अर्थ म्हणजे जो 

गर्जना करतो.

मी शास्त्रज्ञाला विचारले, "जर स्फोटांची मालिका असेल, तर ती गर्जना असू शकते का? केवळ एकच स्फोट होता की तो सतत घडणारा होता?" त्याने त्याबद्दल विचार केला, आणि मग तो म्हणाला, "फक्त एकच असू शकत नाही, तो एका क्षणापेक्षा जास्त काळ असला पाहिजे." आणि मी म्हणालो "तुम्ही त्याला स्फोट का म्हणत आहात? ती एक गर्जना आहे, नाही का?" जर तुम्ही कधी सायलेन्सरशिवाय मोटरसायकल किंवा गाडी चालवली, तर तुम्ही पहाल की ती "बँग, बँग, बँग" करेल, पण जर तुम्ही थ्रॉटल वाढवला, तर ती गर्जना ठरेल. गर्जना ही अनेक स्फोटांची एक संमिश्र अभिव्यक्ती आहे.

जे सध्या चक्राकार फेरी पूर्ण करून येणाऱ्या घटनात्मक पद्धतीने जाणून घेतले जात आहे, ते खूप पूर्वी जाणले गेले होते. जर पुरेसे खोलवर पाहिले तर, प्रत्येक माणूस ते जाणून घेऊ शकतो.


(ईशा फाऊंडेशन)