अंडा पराठा

Story: चमचमीत रविवार |
20th December, 10:48 pm
अंडा पराठा

​लागणारे साहित्य 

​आवरणासाठी:

​कणीक: २ वाट्या

​पातळ डालडा (मोहनासाठी): ४ मोठे चमचे (टेबलस्पून)

​मीठ: चवीनुसार

आतील सारणासाठी:

​अंडी: ३ ते ४

​कांदा: १ (बारीक चिरलेला)

​हिरव्या मिरच्या: ४ ते ५ (बारीक चिरून)

​गरम मसाला: १/२ चमचा

​कोथिंबीर: थोडीशी (बारीक चिरलेली)

​मीठ: चवीनुसार

​तूप: गरजेनुसार

​कृती:

​सर्वात आधी एका वाटीत अंडी फोडून घ्यावीत. गॅसवर कढईत थोडे तूप गरम करून त्यावर बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा परतला की त्यात फोडलेली अंडी, मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि गरम मसाला घालून व्यवस्थित हलवावे. अंड्याचे मिश्रण नीट शिजले की गॅस बंद करून खाली उतरवावे. ​यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यावे.

​कणकेमध्ये चवीनुसार मीठ आणि कडकडीत गरम केलेल्या डालड्याचे मोहन घालावे. पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घ्यावे आणि अर्धा तास झाकून ठेवावे. भिजवलेल्या पीठाचे दोन छोटे गोळे घेऊन त्यांच्या दोन पुऱ्या लाटून घ्याव्यात. एका पुरीवर तयार केलेले अंड्याचे सारण थोडे पसरवून ठेवावे. ​त्यावर दुसरी पुरी ठेवून कडा नीट दाबून बंद कराव्यात. ​थोड्या कोरड्या पिठाचा वापर करून हलक्या हाताने पराठा थोडा लाटून घ्यावा. ​तवा गरम करून त्यावर पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस शेकून घ्यावा. शेकताना बाजूने तूप सोडावे जेणेकरून पराठा छान 

कुरकुरीत होईल.


​टीप: हा गरमागरम अंडा पराठा टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीसोबत अतिशय चविष्ट लागतो.


- शिल्पा रामचंद्र 

मांद्रे